Ad will apear here
Next
पुण्यातील वारसा महोत्सवात अनुभवता येणार अजिंठा-वेरूळचे अलौकिक सौंदर्य
पुणे : अजिंठा लेण्यांचा पुन्हा शोध लागल्याच्या घटनेला यंदा २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वारसा महोत्सवात अजिंठा आणि वेरूळ या दोन जागतिक वारसास्थळांचे अलौकिक सौंदर्य एकाच वेळी अनुभवण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना मिळणार आहे. चार व पाच जानेवारी २०२० रोजी होत असलेल्या या महोत्सवात छायाचित्रे, चित्रे, शिल्पे, माहितीपट व व्याख्यानांमधून या दोन्ही वारशांचे महत्त्व रसिकांपुढे उलगडणार आहे.

अजिंठा लेण्यांचा पुन्हा शोध लागल्याच्या घटनेला यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त ‘इमेज मीडिया’ या पुणेस्थित संस्थेने Timeless Ajanta-Timeless Ellora (टाइमलेस अजंठा-टाइमलेस एलोरा) या फोटोबुकची निर्मिती नुकतीच केली. या फोटोबुकला दोन मुखपृष्ठे असून, अजिंठा आणि वेरूळमधील छायाचित्रांची प्रत्येकी एका बाजूने मांडणी करण्यात आली आहे. भारताचा अमूल्य वारसा सर्वांगाने रसिकांपर्यंत पोहोचावा, या हेतूने संस्थेने यंदापासून वारसा महोत्सवाचे आयोजन सुरू केले आहे. याची सुरुवात अजिंठा-वेरूळपासून होत आहे. ‘वॅनसम इंडस्ट्रीज’ हा उद्योगसमूह यंदाच्या महोत्सवाचा मुख्य प्रायोजक असून, ‘महाराष्ट्र टाइम्स’ माध्यम प्रायोजक आहे.

पुण्यातील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील सभागृह व तेथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत चार जानेवारीला सकाळी ११.३०पासून पाच जानेवारीला रात्री आठपर्यंत हा महोत्सव असेल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

अजिंठा लेणी (फोटो : विकीपीडिया)

‘वारसा महोत्सवा’तील प्रदर्शनात अजिंठा-वेरूळची दीडशेहून अधिक ताजी, अप्रतिम छायाचित्रे रसिकांना पाहता येतील. बिटिश अधिकाऱ्यांनी एकोणिसाव्या शतकात अजिंठा-वेरूळला भेट देऊन अनेक महत्त्वपूर्ण नोंदी केल्या होत्या. यात जेम्स बर्जेस, जेम्स फर्गसन, रॉबर्ट गिल, विल्यम ली वॉर्नर आदींचा समावेश होता. त्यांनी त्या वेळी काढलेली रेखाटने, चित्रे व छायाचित्रे ब्रिटिश लायब्ररीकडे आहेत. यातील जुनी व दुर्मीळ चित्रे-छायाचित्रे या महोत्सवात रसिकांना पाहता येतील. सोबत, आताच्या कलाकारांनी काढलेली चित्रे, रेखाटनेही असतील. याशिवाय, अजिंठा-वेरूळमधील काही प्रसिद्ध शिल्पांच्या प्रतिकृती महोत्सवातील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. पन्नास-साठच्या दशकात तयार झालेल्या माहितीपटातून त्या वेळच्या अजिंठा-वेरूळचे दर्शनही रसिकांना होईल.

वारसा महोत्सवातील तज्ज्ञांची व्याख्याने ही तर रसिक-जिज्ञासूंसाठी पर्वणी आहे. कालौघात झीज झालेल्या वेरूळमधील शिल्पांचे मूळ सौंदर्य अनुभवण्याची संधी रवींद्र बोरावके यांच्या व्याख्यानातून मिळणार आहे. चार जानेवारीला सायंकाळी पाच वाजता राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत हे व्याख्यान होईल. अजिंठ्यातील चित्रांचे मूळचे सौंदर्य पुन्हा कागदावर उतरवण्याचा प्रयत्न नाशिकचे कलाकार प्रसाद पवार करीत आहेत. त्याविषयीचे त्यांचे व्याख्यान पाच जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे.

वारसा महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम पाच जानेवारीला (रविवार) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत होईल. यात डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचे ‘अजिंठ्यातील चित्रे व चित्राकाश (डेकोरेटिव्ह मोटिफ्स)’ या विषयावर, तर अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या अभ्यासक व लेखिका डॉ. राधिका टिपरे यांचे ‘वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ या विषयावर व्याख्यान होईल. दोन्ही व्याख्यानांपूर्वी कलावर्धिनी नृत्यालयाच्या कलाकार भरतनाट्यमद्वारे बुद्ध व शिव साकारणार आहेत.

वारसा महोत्सव : अजिंठा-वेरूळ
स्थळ : घोले रस्त्यावरील पुणे महानगरपालिकेची राजा रविवर्मा आर्ट गॅलरी व पं. नेहरू सभागृह.
दिवस : चार व पाच जानेवारी २०२०
वेळ : शनिवारी सकाळी ११.३० ते रविवारी रात्री आठ

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये :
- अजिंठा-वेरूळ जागतिक वारसा स्थळांची १५० अप्रतिम छायाचित्रे.
- ब्रिटिश लायब्ररीकडील जुनी व दुर्मीळ छायाचित्रे.
- साठच्या दशकात काढलेली कृष्णधवल छायाचित्रे.
- वेरूळ-अजिंठाच्या डिजिटल पुनर्निर्मितीची छायाचित्रे.
- दोन्ही वारसास्थळांची चित्रे, स्केचेस.
- काही अप्रतिम शिल्पांच्या प्रतिकृती.

व्याख्याने : 
वेरूळच्या शिल्पांची डिजिटल पुनर्निमिती : रवींद्र बोरावके : चार जानेवारी, सायंकाळी पाच
अजिंठाच्या चित्रांची डिजिटल पुनर्निमिती : प्रसाद पवार : पाच जानेवारी, सकाळी ११
अजिंठा - चित्रे व चित्राकाश : डॉ. श्रीकांत प्रधान : पाच जानेवारी, सायंकाळी पाच
वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव : डॉ. राधिका टिपरे : पाच जानेवारी, सायंकाळी सहा
दोन्ही व्याख्यानांपूर्वी भरतनाट्यम नृत्यातून शिव व बुद्ध साकारणार. 

(अजिंठा-वेरूळ लेण्यांबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZYHCI
Similar Posts
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
६७वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव - चौथ्या दिवसाचे व्हिडिओ पुण्यात सध्या सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चौथ्या दिवशी (१४ डिसेंबर २०१९) किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी कन्नड-मराठी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. शाकिर खान (सतार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन, स्वामी कृपाकरानंद, तसेच अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन, डॉ
‘भैरव भवतारक’ नृत्याविष्काराद्वारे नवरसांची अनुभूती पुणे : भक्ती, शक्ती, करुणा, शृंगार, क्रोध अशा विविध भावनांचा मिलाफ असलेल्या ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराने पुणेकर रसिकांना नवरसांची अनुभूती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऋत्विक फाऊंडेशन’ व ‘ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमी’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कथक नृत्यांगना
वॉक फॉर खादी : ‘ला-क्लासे’ फॅशन शोने जिंकली मने पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘ला क्लासे’ फॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राइड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language